विद्धकर्म, अग्नीकर्म आणि पंचकर्म केंद्र
डॉ.रा.ब.गोगटे सर व डॉ. चंद्रकुमार देशमुख सर यांच्या जन्मदिनानिमित्त दर वर्षी 4 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी online व्याख्यान सत्र घेतले जाते. डॉ. रा. ब. गोगटे मरांनी अग्निकर्म व विध्दकर्मामध्ये केलेले काम संपुर्ण देशभरात पोहचावे म्हणून दर वर्षी विभिन्न विषयावर अग्निकर्म व विद्धकर्माचे तज्ञ वैदांकडुन online व्याख्याने दिली जातात.
श्री वारकरी आयुर्वेद चारीटेबल ट्रस्ट मार्फत हा कार्यक्रम राबवला जातो. यामध्ये दरवर्षी BAMS च्या प्रथम वर्षाच्या मुलांची मुलाखत घेऊन श्री वारकरी आयुर्वेद विभुती विस्तारमध्ये समावेश करून घेतले जाते. त्यांची आयुर्वेदाबद्दलचे शिक्षण व मार्गदर्शनासाठी दर आठवड्याला २ ते ३ online लेक्चर घेतले जातात.
श्री वारकरी आयुर्वेद चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत दर पुष्य नक्षत्रादिवशी श्री स्वामी समर्थ मंदिर, नांदेड येथे मोफत सुवर्ण प्राशन शिबीर घेतले जाते. या शिबीरामध्ये दर महिन्याला 100 ते 150 बालक मोफत सुवर्ण प्राप्ताचा लाभ घेतात.
श्री वारकरी आयुर्वेद चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय आळंदी येथे श्री वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील मुलांची मोफत तपासणी व मोफत औषधी दिली जाते.
Copyright © 2023 Shri Varkari Ayurved | Powered By Ambica Labs