श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय​​

विद्धकर्म, अग्नीकर्म आणि पंचकर्म केंद्र

Coming Soon

Edit Template

आमच्या बद्दल

डॉ. योगेश पुरुषोत्तम मरलापल्ले

B.A.M.S

अग्निकर्म, विद्धकर्म तज्ञ

श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय

7558680016

मी डॉ. योगेश आपणासमोर श्री वारकरी आयुर्वेद कसा बहरत आहे याबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त करतो.

मी एका शेतकरी कुटुंबातून बी. ए. एम. एस. ला आलेला विद्यार्थी. बी.ए. एम. एस. झाल पण आयुर्वेदिक प्रॅक्टिस कशी सुरु करावी याबद्दल काहीच कळत नव्हत. अभ्यासक्रमात जे शिकलय त्याचा प्रत्यक्षात कसा वापर करावा हे मात्र कळत नव्हतं. तेव्हा नुकताच अंतिम वर्ष उत्तीर्ण झाले होते व डॉक्टर चंद्रकुमार देशमुख सरांची भेट झाली. सरांनी खूप मार्गदर्शन केल, सरांच UG आमच्याच कॉलेजच म्हणजे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथील. जेव्हा मी प्रथम वर्षाला आलो होतो, तेव्हा सरांच इंटरशिप पूर्ण झाल होत व या पाच वर्षात सरांची पुणे, चिंचवड, नांदेड व देहू अशा चार ठिकाणी प्रॅक्टिस आहे. हे पाहून मला कुतूहलच होत. सरांच अफाट अस ज्ञान,डॉ. गोगटे सरांचे पटशिष्य अशी ख्याती, अग्निकर्म व विद्दकर्मात पारंगत, जे रुग्ण ठीक करण्यासाठी अनेक वैद्य हजारो रुपयांची औषधे वापरतात, तिथे सर फक्त विद्धकर्म करून व अत्यंत सोपे औषधे वापरून रुग्ण ठीक करत हे सर्व पाहून मी तर खूपच प्रभावित होतो. अशा पद्धतीने एक वर्ष पार पडले व माझी इंटरंशिप संपली व मी अर्थातच डॉक्टर झालो. 

 

आता इथून पुढचा प्रवास मात्र अवघड होता. कारण डॉक्टर तर झालो होतो खरा पण आयुर्वेदिक प्रॅक्टिस कशी करायची हे मात्र काहीच कळत नव्हते. मग डॉक्टर चंद्रकुमार देशमुख सरांनी मला पुण्याला सोबत घेऊन आले व माझ्या आयुष्याला परीसस्पर्शच झाला. सरांनी आयुर्वेदाचे सर्व ज्ञान, अग्निकर्म व विद्धकर्मा सारखी अनमोल चिकित्सा शिकविली. पुण्यात सरांकडे असताना joint pain, sciatica, cervical & lumbar spondylosis यासारखे पेशंट ऑपरेशन विना अग्निकर्म व विद्धकर्माने ठीक होताना पाहिले. तसेच paralysis, cerebral palsy, delay milestone सारख्या असाध्य आजारांना सुद्धा ठीक होताना पाहिले. तेव्हा मनात सारखा विचार यायचा की ही चिकित्सा सामान्यातील सामान्य माणसांपर्यंत कशी पोहचेल ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातल्या लोकांना याचा कसा लाभ होईल.


डॉक्टर चंद्रकुमार देशमुख सर दर बुधवारी गाथा मंदिर येथे मोफत आयुर्वेदिक चिकित्सा व औषधे देतात व ते गेली पाच वर्षापासून निरंतर दर बुधवारी सेवा देत असतात व तुकाराम बीजेच्या वेळेस मोठे आरोग्य शिबिर असत. त्यात 3 ते 4 हजार लोक याचा लाभ घेतात. मी पुण्याला गेल्यानंतर तुकाराम बिजेनिमित्त पहिल्यांदाच शिबिराला होतो. दिवसभर शिबिर झाल नंतर सायंकाळी कीर्तन ऐकले. दिवसभर थकून रात्री इंद्रायणीच्या काठी निवांत बसले असता माझ्यासोबत ज्ञाना, गणेश, सुनील, विष्णू व रामदास हे सर्व होते.सर्वांशी चर्चा करता लक्षात आले की आमच्या समोर दोन प्रश्न होते. एक म्हणजे आम्ही ज्या परिस्थितीतून आलो म्हणजे आयुर्वेदाची घराणेशाही नसलेल्या परिवारातून येऊन आयुर्वेदिक प्रॅक्टिस करने एक खूप मोठे कठीण काम होते. कारण आयुर्वेदाचे ज्ञान हे अनुभवीना काही समजत नाही व ज्यांना आयुर्वेद समजतो ते आयुर्वेदाचे ज्ञान द्यायला तयार नाहीत. आम्हालाच सर मिळाले नसते तर आम्ही आयुर्वेदाकडे आलोच असतो का नाही हा एक प्रश्नच आहे.


आता दुसरा प्रश्न हा की सामान्य लोकांपर्यंत आयुर्वेदिक चिकित्सा कशी पोहोचेल. व आपण त्यासाठी काय करू शकतो. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांपर्यंत व सामान्य लोकांपर्यंत आयुर्वेद कसा नेता येईल यासाठी श्री वारकरी आयुर्वेदाचा विचार त्या देहूच्या पुण्यभूमीत आला.


मग चैत्र शुद्ध प्रतिपदा( गुढीपाडवा) १९४१ दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी श्री वारकरी आयुर्वेदाची आमच्या सर्व मित्र परिवाराच्या साथिने सुरुवात झाली. त्यातूनच उदगीर व लातूर येथ श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालयाची सुरुवात केली. श्री वारकरी आयुर्वेद फक्त चिकित्सालय नसून ती एक संकल्पना आहे व या संकल्पनेविषयी जोडून आमचे सहकारी ज्ञानेश्वर, गणेश, सुनिल, विष्णू, रामदास, रामेश्वर, कुणाल असे अनेक जण दिवस रात्र काम करत आहेत. श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय सुरू करताना अनेकांची मदत लागली यामध्ये डॉ. अमोल कोल्हे, सिद्धेश्वर कोल्हे, डॉ.चिंतन सर, डॉ.सुजाता, संदीप पुंड, गौरव बोथरा यांचे अनमोल मार्गदर्शन व आर्थिक मदतही लाभली.


श्री वारकरी आयुर्वेद सुरु करण्यामागे सगळ्यात मोठा हात म्हणजे डॉ. चंद्रकुमार देशमुख सरांचा होता. सरांचे नेहमी मार्गदर्शन व एवढ्या मोठ्या कार्याला पाठिंबा दिल्यामुळे कधी भीती आणि चिंता वाटली नाही.
लहापणापासूनच गावातील सद्गुरू धोंडुतात्या महाराजांच्या मंदिरातील भजन किर्तनात आवड व वारकरी संप्रदायाचे संस्कार, पुढे आयुष्यात ज्ञान मिळाले ते आयुर्वेदाचे, तसेच सहकार्याना पण समाजासाठी व आयुर्वेदासाठी काहीतरी करायची आवड, त्यातून ही श्री वारकरी आयुर्वेदाची संकल्पना दृढ झाली.


ज्यांना आयुर्वेदाची आवड आहे व आयुर्वेदीक प्रॅक्टिस करायची आहे, त्यांच्या मदतीसाठी श्री वारकरी आयुर्वेद नेहमीच उत्सुक आहे. तसेच आयुर्वेदिक चिकित्सा घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी श्री वारकरी आयुर्वेद सदैव तत्पर आहे. श्री वारकरी आयुर्वेद समाजातील इतरही अनेक समस्येवर कार्य करण्यासाठी विचार करत आहे. कार्याची स्पष्टता झाली की लागलीच आपल्यासमोर ठेवले जाईल…

डॉ. सुनिल खंडेराव मोरे

B.A.M.S

अग्निकर्म, विद्धकर्म तज्ञ

श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय

9049623325

मी डॉ. सुनिल, श्री वारकरी आयुर्वेदाशी कसा जोडला गेलो याबददल थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे.

मी M.B.B.S. ला प्रवेश मिळाला नाही म्हणून B.A.M.S. ला आलेला एक विद्यार्थी. प्रथम वर्षाला असताना B.A.M.S. चा अभ्यासक्रम, संस्कृत श्लोक, हे सर्व पाहुन, वाचताना, अभ्यास करत असताना अत्यंत क्लेश निर्माण झाला. आपण BAMS ला येऊन काही चुक तर केली नाही ना? असा प्रश्न नेहमी असायचा. प्रथम वर्षाचे पहिले ८ महिने तर याच विचारात गेले. तद्नंतर प्रथम वर्षाची परीक्षा जवळ आली तेव्हा माझाच वर्गमित्र ज्ञानेश्वर याच्या मार्फत डॉ. योगेश सरांशी ओळख झाली. तेव्हा, त्यांचे नुकतेच अंतिम वर्ष संपले होते. मी, गणेश, ज्ञानेश्वर, रामदास, विष्णू असा 5-6 जणांचा एक ग्रुप होता. योगेश सर म्हणजे आमच्या बाकीच्या सिनीयर्स पेक्षा एक वेगळं व्यक्तीमत्व. त्यांच्या आपुलकीच्या, प्रेमाच्या बोलण्यामुळे त्यांच्याशी जवळीकता वाढत गेली व योगेश सरांचे योगेश भैय्या कधी झाले कळलेच नाही. प्रथम वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यामध्ये त्यांनी आमचे अष्टांग ह्रदयचे पाठ सुरु केले. त्यांची समजावुन सांगण्याची पद्धत, शास्त्रपठण, शास्त्रवाचन हे पाहुन आयुर्वेदाकडे कसे पाहावे ही दृष्टीच जणु मिळत गेली. त्यामुळे प्रथम वर्ष कसे गेले हे समजलच नाही. पुढे भैय्या कडून डॉ. चंद्रकुमार देशमुख सरांची ओळख झाली.

डॉ. देशमुख सर म्हणजे माझ्यासारख्या BAMS ला आलेल्या एका नव्या विद्यार्थ्यांसाठी एक चैतन्य.
आयुर्वेदिक डॉक्टरांकडे एवढे पेंशट,गर्दी असते, हे पहिल्यांदाच सरांच्या क्लिनिक ला पाहिले. अग्निकर्म,विद्धकर्मामुळे रुग्णांना लवकर बरे वाटत होते,त्वरित उपशय मिळतो. हे पाहून आयुर्वेदिक प्रॅक्टीस करण्याचा विश्वास वाढत गेला. यामध्ये मदत झाली ती भैय्यांची. भैय्यांमुळे अग्निकर्म विद्धकर्माचा पाया पक्का होत गेला. पुढे आपणही आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची हे पक्क झाल होत.

पण आपण स्वतः एकट्याने, कोणाची काही मदत नसताना आयुर्वेदिक चिकित्सा करणे, याची मनात भीती होती. हे सर्व आपल्या कडून होईल का? असा प्रश्न होता. याबाबत भैय्यासोबत बोलताना भैय्यांनी श्री वारकरी आयुर्वेद हा विचार आमच्यासमोर सांगितला.

एकट्याने स्वतः काही करण्यापेक्षा चार-चौघाची ताकद एकत्र करून श्री वारकरी आयुर्वेद या छत्राखाली येऊन काम करण्याने आपल्यासोबतच आपल्याकडील लोकांपर्यंत आयुर्वेद पोहचवणे हे सोईचे होणार होते. याच संकल्पनेसोबत आम्ही सर्वांनी काम सुरू केले. भैय्यांच्या याच विचाराला आम्ही प्रमाण मानून आजपर्यंत एकत्र काम करत आहोत. लातुर येथे श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालया अंतर्गत मी उत्कृष्टरित्या अग्निकर्म व विद्धकर्माच्या मदतीने अनेक रुग्णांनवर उपचार करत आहे.

सध्या श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय हे उदगीर, लातुर, जालना या ठिकाणी सुरू आहे व हे असेच वृद्धिंगत होईल हा विश्वास आहे. याचबरोबर माझ्यासारख्या नवीन वैद्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे, अग्निकर्म विद्धकर्म सर्वापर्यंत पोहचावे यासाठी श्री वारकरी आयुर्वेद हे भैय्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहे. श्री वारकरी आयुर्वेदातील सर्वांचा एकमेकांवरील विश्वास व प्रेम आणि आयुर्वेद पुढे नेत काम करतानाचा आनंद हे सर्व श्रीगुरु कृपेने प्राप्त झाले, हे माझे आहोभाग्य व असा कृपापात्र भाग्यशाली हाच माझा परिचय…

डॉ. ज्ञानेश्वर सुनीलराव खरात

B.A.M.S

अग्निकर्म, विद्धकर्म तज्ञ

श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय

8263809911

मी डॉ. ज्ञानेश्वर खरात आपणासमोर श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय बद्दल थोडक्यात  मनोगत व्यक्त करतो.

मी 2016 वर्षी B.A.M.S ला admission घेतल. मी तसा कॉन्व्हेन्ट चा विद्यार्थी होतो त्यामुळे मला थोड हा अभ्यासक्रम अवघड वाटत होता, कारण मराठी , संस्कृत ह्या विषयाचा संबंध येणार होता. मी प्रथम वर्षातच ठरवला होत की आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आयुर्वेदाची तेव्हा काही गोडी नसल्यामुळे त्या अभ्यासात रस पण नव्हता. मी GMC ला जाऊन casualty करायच ठरवल आणि मॉडर्न प्रॅक्टिस चा विचार माझ्या डोक्यात होता. पण नेमकी त्या वेळी माझी भेट आमचे सीनिअर डॉ. योगेश मरलापल्ले यांच्याशी झाली. मी त्यांना माझा हा प्लॅन सांगितला. 

त्याने हसुन विचारले की आयुर्वेद प्रॅक्टिस नाही करणार का ?

मी पटकन उत्तर दिले, नाही. कारण त्याची काही माहितीच नव्हती आणि अभ्यास पण अवघड वाटत होता. त्यांनी मला तेव्हा म्हणजे फर्स्ट year लाच सांगितल की, मी सांगेल तसा अभ्यास कर म्हणजे फायनल year पर्यंत तू तुझी ओपीडी टाकशील…!!

मला विश्वास बसला नाही की खरच हे शक्य होईल का..??माझ्या आयुष्यातील पहिली व्यक्ती ज्याने माझा आयुर्वेदा प्रती बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि हाच माझ्या आयुष्यातला हा एक टर्निंग पॉइंट होता. नंतर ते सीनिअर न राहता आमच्या साठी योगेश भैय्या झाले.

माझे मित्र सुनील, गणेश, विष्णू, रामदास हे पण भैया च्या संपर्कात आले. त्यामुळे आमचा एक ग्रुप तयार झाला. भैय्या ने आमचे लेक्चर घ्यायचे, रोज आयुर्वेदाचे पाठ घ्यायचे, श्लोक पाठ करून घ्यायचे, संहिता वाचन घ्यायचे आणि इथूनच सुरू झाला आमचा आयुर्वेदाचा प्रवास..

योगेश भैय्या हे नामांकित अग्निकर्म विद्धकर्म पारंगत वैद्य चंद्रकुमार देशमुख सरांकडे practice ला जात होते. भैय्यानी आम्हाला सरांच्या opd ला नेल. आयुर्वेदाची ओपीडी काय असते ते तिथ जाऊन कळल. सरांकडे रोज चे २०० च्या वर रुग्ण यायचे आणि तिथे सर विद्धकर्म करून व अत्यंत सोपे औषध वापरून रुग्ण ठीक करत. हे सर्व पाहून मी तर एकदम प्रभावित झालो. तेव्हा पासून आयुर्वेद प्रॅक्टिस बद्दल माझी काही शंकाच उरली नाही. नंतर सरांसोबत पुण्यात व देहूला जाऊन अनेक रुग्ण बरे होताना पाहिल, ते पण कमी पैशात.

सरांनी आयुर्वेदाचे ज्ञान, अग्नीकर्म व विद्धकर्मा सारखी अनमोल चिकित्सा शिकवली. अग्निकर्म, विद्धकर्म हे खरच अद्भुत चिकित्सा आहे. भैय्या व आम्ही जेव्हा सगळे बसायचो, तेव्हा आम्हाला सर्वांना वाटायचे की ही चिकित्सा आपण सर्व सामान्य लोकांपर्यंत व विद्यार्थ्यांन पर्यंत कशी पोहचवावी. त्या साठीच चैत्र शुध्द प्रतिपदा ( गुढीपाडवा) शके १९४१ दिनांक ६ एप्रिल २०१९ रोजी श्री वारकरी आयुर्वेदाची आमच्या सर्व मित्र परिवाराच्या साक्षीने सुरुवात झाली. श्री वारकरी आयुर्वेदाचा एक भाग म्हणून उदगीर व लातूर येते श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालयाची ची सुरुवात झाली. अनेक गोरगरीब रुग्णापर्यंत विद्धकर्म व अग्निकर्म चिकित्सा पोहचवली जात आहे. नांदेड मध्ये गणेश औषाधिकरण विभाग सांभाळत आहे. च्यवनप्राश, शतावरी कल्प असे अनेक कल्प बनवले जातात. अश्या प्रकारे आम्ही वारकरी आयुर्वेदा मध्ये सामील झालो.

मी जे आयुर्वेद practice करण्याचं स्वप्न पाहिल होत ते साध्य झाल. वारकरी आयुर्वेदाची आणखी एक शाखा जालना येथे सुरू झाली.

ज्यांना आयुर्वेदाची आवड आहे व आयुर्वेद प्रॅक्टिस करायची आहे. त्यांच्या मदतीसाठी श्री वारकरी आयुर्वेद नेहमी तत्पर आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला वारकरी आयुर्वेदा मध्ये येऊन अनेक रुग्णांची सेवा करता आली आणि पुढ पण ती चालू राहणार. सर्वसामान्यापर्यंत आयुर्वेद पोहचवण्याचे श्री वारकरी आयुर्वेदाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी श्री वारकरी आयुर्वेद व समाज यातील दुवा हाच माझा परिचय…

डॉ. गणेश महादु घ्यार

B.A.M.S

अग्निकर्म, विद्धकर्म तज्ञ

श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय

7083806505

मी डॉ. गणेश महादु घ्यार आपणासमोर श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय बद्दल थोडक्यात  मनोगत व्यक्त करतो.

मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा B. A. M. S ला लागेपर्यंतचा प्रवास सुद्धा फार खडतर होता .आई वडील काका आणि मित्र यांच्या परिश्रमाने मी इथपर्यंत आलो होतो. 2016 ला B.A.M.S ला addmision घेतले.त्यानंतर बरेच दिवस असेच गेले, पण काय कराव हे काही कळत नव्हतं आणि मार्गदर्शन करणार कोणी नव्हते. तेव्हा मी आणि माझा मित्र वैभव आम्ही दोघ GMC ला जाऊन casulty करत होतो. असेच ६-७ महिने उलटल्यानंतर मी एकदा आजारी पडलो होतो. त्यामुळे माझा मित्र ज्ञानेश्वर ने सिनियर योगेश सरांना बोलवलं व तिच माझी आणि योगेश सरांची पाहिली भेट. यापूर्वीपर्यंत मला आयुर्वेदाबद्द्ल काहीच माहिती नव्हती. 

 

नंतर मी आणि माझे मित्र सुनील,ज्ञाना,विष्णू रामदास सर्वांनाच योगेश सरांनी विचारलं, की तुम्ही पुढे काय करणार? तेव्हा मात्र माझ्याकडे काहीच उत्तर नव्हत. नंतर योगेश सरांनी म्हटल, मी सांगतो तस कराल तर तुम्ही INTERSHIP ला येईपर्यंत आयुर्वेदाची PRACTICE सुरु कराल. तेंव्हा या गोष्टीवरती माझा विश्वास बसत नव्हता, परंतु त्यानंतर योगेश सरांनी त्यांचा वेळातला वेळ काढून आमचे वाग्भट वाचन सुरू केले आणि श्लोक पाठ करून घ्यायचे. अश्या प्रकारे आयुर्वेदाचा प्रवास सुरु झाला आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे योगेश सरचे योगेश भैय्या झाले …🥰 

 

त्यानंतर योगेश भैय्यानी आयुर्वेदातील नामांकित वैद्य चंद्र्कुमार देशमुख सरांकडे practice ला पाठवल. सरांकडे आल्यानंतर मी एवढी रुग्णाची गर्दी प्रथमतः पाहिली. मला आश्चर्य वाटले की आयुर्वेदिक opd ला सुद्धा एवढी गर्दि असू शकते. सरांकडे अग्निकर्म विद्धकर्म व सोबत अत्यल्प औषध देऊन, मापक फीसमध्ये रुग्ण बरे होताना दिसत होते. वारंवार सरांकडे जाऊन रुग्ण बघून मात्र आयुर्वेदा वरती असलेला विश्वास हा दृढ होत गेला व आपणही आयुर्वेद practice करू शकतो यामध्ये मात्र कसलीच शंका राहिली नाही. देशमुख सरांनी आयुर्वेदातील अग्निकर्म विध्दकर्म अशी अनमोल चिकित्सा शिकवली हे आमचे आहोभाग्यच… देशमुख सरांची दर बुधवारी गाथा मंदिर देहू येथे मोफत रुग्ण तपासणी असते. व दरवर्षी तुकाराम बीज ला देहू येथे खूप मोठे आरोग्य शिबीराचे आयोजन करतात. यामधे ३ ते ४ हजार रुग्नाना मोफत् औषध अग्निकर्म् व् विद्धकर्म् हि चिकित्सा केली जाते.. २०१९ ला प्रथमतः मला सहभागी होता आले.शिबिरानंतर रात्री मी, सुनील, ज्ञाना, विष्णू रामदास आणि योगेश भैय्या आम्ही सर्व इंद्रायणी नदीतीरी बसलो होतो. भैय्या नेहमी म्हणायचे की आयुर्वेद हा सामान्य, अति सामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी एकट्याने प्रयत्न करून काही होणार नाही आपण सर्वांनी येऊन एकत्र मिळून काहीतरी केले पाहीजे. याच विचारातून लवकरच… चैत्र शुद्ध प्रतिपदा ( गुढीपाडवा )१९४१ दिनांक ६ एप्रिल २०१९ रोजी श्री वारकरी आयुर्वेदाची सुरुवात झाली. नंतर यातूनच उदगीर, लातूर येथे श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालायची सुरुवात झाली.

 

 योगेश भैय्या नेहमी म्हणतात आपल्याला चिकित्सालया बरोबरच अनेक संकल्पना राबवायच्या आहेत. यामध्ये आयुर्वेद रसशाळा ही एक संकल्पना होती आणि ती जिम्मेदारी भैय्यानी माझ्यावरती सोपवली. मग मी आणि माझे मित्र मिळून देशमुख सर व योगेश भैय्या यांच्या मार्गदर्शना खाली औषधी बनवायला सुरुवात केली. यामध्ये आम्ही शतावरी कल्प, च्यवनप्राश, गुगुल कल्प, घृत व तैल बनवायला सुरुवात केली. त्यानंतर मी पुण्याला जाऊन रसशास्त्रामध्ये प्रविण्य मिळवलेलं वैद्य पार्थ काळे सरांकडे काही दिवस जाऊन औषधिकरणातील बारकावे, विविध रसकल्प कुपीपक्व रसायन, पोट्टली कल्पना, आसव, आरिष्ट कल्पना व इतर औषधी कल्पना शिकलो.


चिकित्सा चतुष्पादात औषध हा एक महत्वाचा भाग आहे. श्री वारकरी आयुर्वेदात तो औषधी विभाग सांभाळताना खुप काही शिकायला मिळत आणि ज्याच्या शोधात सारी दुनिया भटकत आहे ते समाधान प्राप्त होत. सुरुवातीला किलो मध्ये बनवणारी औषध आज आम्ही क्विंटलने बनवतो आणि उत्तरोत्तर हे सर्व वाढतच जाणार आहे. श्रीगुरु कृपेने लवकरच श्री वारकरी आयुर्वेद रसाशाळेच स्वप्न पूर्ण होईल आणि वैद्य व रुग्णांना उत्तम दर्ज्याचे औषधी मोठ्या प्रमाणावर मिळतील. 

 

शेवटी मला एवढंच सांगावस वाटत की आयुष्यामध्ये गुरु लाभन आणि योग्य मार्गदर्शन मिळण फार महत्वाच असतं. आज जो काही मी आहे तो फक्त योगेश भैय्या आणि गुरुवर्य चन्द्रकुमार देशमुख सरांमुळेच आहे. श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालयाची आणखी एक शाखा नुकतीच जालना मधे सुरु होत आहे .श्री वारकरी आयुर्वेद असाच गुरुवर्याच्या आशीर्वादाने आणी योगेश भैय्याच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्षाप्रमाणे बहरत राहील. ज्या कुणाला आयुर्वेदाची आवड आहे. आयुर्वेदात काहीतरी करण्याची इच्छा आहे. अश्या सर्वांच्या मदतीस श्री वारकरी आयुर्वेद नेहमी तत्पर आहे… 

 

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण आयुर्वेदाची कसलीच पार्श्वभूमी नसलेला मी श्री वारकरी आयुर्वेदात औषधी विभाग सांभाळतो व रुग्ण पाहतो ही माझी बुद्धिमत्ता नसुन गुरुवर्य चंद्रकुमार देशमुख व योगेश भैय्याचे मार्गदर्शन आहे व हाच माझा खरा परिचय आहे…

स्थापना

श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय संस्थान

श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय २०१८ मध्ये सुरु करण्यात आले.

March 2013LA, California
May 2015JP, Tokyo
Sept 2018Workshops
Jun 2022New Order

Testimonial

What Clients Think

Our Team

Meet Our Qualified Team

Alexis Stokes

Alexis Stokes

Doctor
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Curabitur laoreet cursus volutpat. Aliquam sit amet ligula et justo tincidunt laorsoet non vitae lorem.
Alissa Leonard

Alissa Leonard

Nurse
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Curabitur laoreet cursus volutpat. Aliquam sit amet ligula et justo tincidunt laorsoet non vitae lorem.
Georgia Mcneil

Georgia Mcneil

Doctor
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Curabitur laoreet cursus volutpat. Aliquam sit amet ligula et justo tincidunt laorsoet non vitae lorem.

श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय​​

Quick Links

Team

Services

Products

Blog

Contact

Branches

Work Hours

।। आयुर्वेदो अमृतानां श्रेष्ठम् ।।

Coming Soon

Edit Template

Copyright © 2023 Shri Varkari Ayurved | Powered By Ambica Labs