श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय​​

विद्धकर्म, अग्नीकर्म आणि पंचकर्म केंद्र

Coming Soon

Edit Template
श्री वारकरी आयुर्वेद अग्निविद्ध व्याख्यान सत्र

डॉ.रा.ब.गोगटे सर व डॉ. चंद्रकुमार देशमुख सर यांच्या जन्मदिनानिमित्त दर वर्षी 4 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी online व्याख्यान सत्र घेतले जाते. डॉ. रा. ब. गोगटे मरांनी अग्निकर्म व विध्दकर्मामध्ये केलेले काम संपुर्ण देशभरात पोहचावे म्हणून दर वर्षी विभिन्न विषयावर अग्निकर्म व विद्धकर्माचे तज्ञ वैदांकडुन online व्याख्याने दिली जातात.

श्री वारकरी आयुर्वेद विभुती विस्तार

श्री वारकरी आयुर्वेद चारीटेबल ट्रस्ट मार्फत हा कार्यक्रम राबवला जातो. यामध्ये दरवर्षी BAMS च्या प्रथम वर्षाच्या मुलांची मुलाखत घेऊन श्री वारकरी आयुर्वेद विभुती विस्तारमध्ये समावेश करून घेतले जाते. त्यांची आयुर्वेदाबद्दलचे शिक्षण व मार्गदर्शनासाठी दर आठवड्याला २ ते ३ online लेक्चर घेतले जातात.

श्री वारकरी आयुर्वेद मोफत सुवर्णप्राशन शिबीर

श्री वारकरी आयुर्वेद चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत दर पुष्य नक्षत्रादिवशी श्री स्वामी समर्थ मंदिर, नांदेड येथे मोफत सुवर्ण प्राशन शिबीर घेतले जाते. या शिबीरामध्ये दर महिन्याला 100 ते 150 बालक मोफत सुवर्ण प्राप्ताचा लाभ घेतात.

श्री वारकरी आयुर्वेद मोफत आरोग्य शिबीर
श्री वारकरी आयुर्वेद चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत प्रत्येक रामनवमीला श्रीराम मंदीर संस्थान मंगरूळ ता. घनसावंगी जि. जालना येथे मोफत आरोग्य शिविर घेतले जाते. या शिबिरात दरववी ६०० ते  ७०० रुग्णांची मोफत तपासणी व मोफत औषधी दिली जातात.
 
श्री वारकरी आयुर्वेद चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत दर वर्षी श्री समर्थ धोंडुतात्या महाराज संस्थान डोंगरशेळकी ता. उदगीर, जि. लातूर येथे मोफत आरोग्य शिबीर घेतले जाते. या शिबिरात दरवर्षी 200 ते 300 रुग्णांची मोफत तपासणी व मोफत औषधी दिली जातात.
श्री वारकरी आयुर्वेद मोफत विध्यार्थी तपासणी

श्री वारकरी आयुर्वेद चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय आळंदी येथे श्री वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील मुलांची मोफत तपासणी व मोफत औषधी दिली जाते.

श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय​​

Quick Links

Team

Services

Products

Blog

Contact

Branches

Work Hours

।। आयुर्वेदो अमृतानां श्रेष्ठम् ।।

Coming Soon

Edit Template

Copyright © 2023 Shri Varkari Ayurved | Powered By Ambica Labs