श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय​​

विद्धकर्म, अग्नीकर्म आणि पंचकर्म केंद्र

Coming Soon

Edit Template

विद्धकर्माचा साक्षात्कार

महत्वाचे लेख

तो ऑगस्टचा महिना होता. मी पुण्यात सरांकडे येऊन दहा एक दिवस झाले असावेत. सर म्हणजे डॉ. चंद्रकुमार देशमुख सर, आज जे काही आयुर्वेदाच ज्ञान मला आहे ती सर्व सरांचीच कृपा. सरांची चिंचवडची ओपीडी झाली की सायंकाळी नानापेठला गोगटे सरांच्या मूळ ओपीडीला पण सरच पेशंट पाहतात.


असाच एक दिवस, मी आणि सर नानापेठला गेलो होतो. गाडी पार्किंग ला लावली व गाडीतून उतरलो, तर समोर एक साठ पासष्ट च्या वयातील बाई जमिनीवरच बसलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की तिला काहीतरी खूप वेदना होत आहेत. आम्ही गाडीतून उतरलेले पाहिल्यानंतर तिचा मुलगा समोर आला, आणि म्हणाला सर माझ्या आईला तुम्हाला दाखवायच आहे, नंबर पण लावलाय, पण तिला पायऱ्या चढायला खूप त्रास होत आहे, तर तुम्ही इथेच तपासता का? सरांनी म्हटले की इथे रोडवर कसे तपासता येईल वर क्लिनिक मध्ये आलात तर बर होईल. त्यांनी होकारार्थी मान हलवली व आम्ही वर क्लिनिक मध्ये आलो.


नानापेठची ओपीडी वरच्या मजल्यावर असल्यामुळे तिला दहा बारा पायऱ्या आहेत. त्या आजीला तेवढ्याच पायऱ्या चढायला पंधरा ते वीस मिनिटे लागले. त्यांना बसवलं पण जात नव्हतं, म्हणून ते वर आले की त्यांना सरळ ओपीडी मध्ये घेतल. सरांनी विचारलं काय त्रास होत आहे ते सर्व सांगा. तिच्या मुलाने सांगितल की डॉक्टर म्हणतात, कमरेच्या सर्व मनक्याची झीज झाली आहे. त्यामुळे ऑपरेशन कराव लागेल पण आमची ऑपरेशन करायची ताकद नाही, आम्ही गरीब माणस खुप दुरून आई गावाहून इकडे पुण्याला माझ्याकडे आली आहे. अस तिच्या मुलाने सांगितल. सरांनी म्हटले की डॉक्टर काय म्हणतात ते जाऊ द्या.तुम्हाला काय त्रास होत आहे ते सांगा?


मग त्या आजीने सुरू केले, कंबर खूप दुखते, बसल्यास पण त्रास होतो, उभारायला तर कसच जमत नाही, दोन्ही पायात खूप मुंग्या येतात, पायात जीव नसल्यासारखा होतो अस बोलत बोलत ती आजी रडायला लागली.

आता सर्व स्पष्ट झाल होत, पेशंट lumbar spondylitis चा होता degenerative changes होते व त्यामुळे nerve root compression होत. त्यांचे MRI चे report वगैरे पाहिले त्यात पण तेच सर्व होत.

मला ही पेशंट चॅलेंजिंग वाटली कारण, ही पुन्हा पूर्वी सारखी कशी होणार? Degenerative changes पुन्हा कसे भरणार? मी मनातल्या मनात म्हणालो की, ही पेशंट जर बरी झाली तर मी आयुर्वेदाला मानलच! कारण नेमकीच इंटरशिप झालेली, पुण्यात येऊन पण दहाएक दिवस झाले होते व आयुर्वेदाच एवढ काही ज्ञान नव्हत.


सरांनी सर्व तपासल कमरेच विद्ध व अग्निकर्म केल व दोन्ही बाजूचे गृध्रसीचे विद्ध घेतले. मला उत्सुकता की यांना, सर काय औषधी देतील? मला वाटल की भली मोठी औषधांची लिस्ट देतील, पण सरांनी एक गुग्गुळ कल्प व अश्वगंधा चूर्ण सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा दुधाबरोबर घ्यायला सांगितले. परत पुन्हा दुसऱ्या दिवशी विद्ध व अग्निकर्मासाठी बोलवल. आता ट्रीटमेंट सुरू झाली अग्नि व विद्धकर्मासाठी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार व बुधवारी यायचे. मला पण ही पेशंट बरी व्हायची उत्सुकता लागली.


एक महिना झाला त्या आजीचा त्रास थोडा कमी झाला पण म्हणावा तसा फरक काही पडला नाही. मग त्या आजीच्या मुलाची कुणकुण सुरू झाली. आणखी किती दिवस लागणार? आम्हाला तर काही फरक जाणवत नाही. सरांनी त्यांना समजावून सांगितले की, मी योग्य तीच ट्रीटमेंट करत आहे. पण मला वेळ लागेल. तुम्ही गडबड करून काही नाही होणार.


मी त्या दिवशी नानापेठ वरून चिंचवडला येताना गाडीत विचारले की, सर या आजीला सुवर्ण कल्प सुरू केले तर लवकर बऱ्या होतील का? सरांनी म्हटले, अरे ती वर्षानुवर्षं झालेले degenerative changes आहेत. महिना पंधरा दिवसात कसे भरणार? आणि पेशंट नीट होत नाही म्हणून सुवर्ण कल्पाचा विचार करण्यापेक्षा आपण जे करत आहोत त्यावर विश्वास ठेवावा.


पुढच्या महिन्यात पेशंटला चांगला फरक पडला, आता तिचा विश्वास पण बसला. ती नियमित पणे आठवड्यातून तीन दिवस अग्नि विद्धकर्म करण्यासाठी यायची. असे आठ नऊ महिने तिने ट्रीटमेंट घेतली. आता ती आपल्यासारखी नॉर्मल दिसत होती, त्रास पण काही नव्हता. मग तिने ट्रीटमेंटसाठी येणं बंद केल.


पुन्हा एक दोन महिन्यानंतर ती ओपीडीला आली. सरांनी विचारल आता कस काय? काय त्रास होत आहे? ती आजी एकदम हासली व म्हणाली, मला काही त्रास नाही सर. मी तर रोज शेतात जात आहे कामाला, दिवसभर वाकून भात लावत आहे, पण कसलाच त्रास नाही. ती सांगताना तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हे बघा सर, मला खाली बसता येत आहे म्हणून तिने खाली मांडी घालून बसून दाखवले. आपल्या हातांनी दोन्ही पायाचे अंगठे धरुन, बघा सर मला वाकता पण येतय व काही त्रास होत नाही. आज ते मुलीला दाखवायच होत म्हणून घेवून आले होते.
मी हे सगळ पाहून चकितच झालो व लगेच बाहेर जाऊन तिच्या नावाचा पेपर शोधून काढला. ती अग्नि विद्ध करण्यासाठी किती वेळा आली आहे हे मोजून पाहील. ती मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आली होती व मी मोजत होतो तेव्हा जुलै महिना सुरू होता. तर या आकरा महिन्यात ती अग्नि विद्धकर्म करण्यासाठी 84 वेळा आली होती. मी लगेच हिशोब केला औषधी व फिस असे तिला महिन्याला हजार दीड हजार लागले असतील, असे दहा महिन्यात पंधरा हजार रुपयात पेशंट आपले पूर्ववत आयुष्य जगत आहे.


आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता. आयुर्वेदावर दृढ विश्वास बसला. आयुर्वेद श्रीमंतांसाठी आहे, गरिबांसाठी नाही ही समजूत दूर झाली. कारण एखादी श्रीमंत व्यक्ती असती तर तिने ऑपरेशन केले असते. पण पूर्वी सारख आयुष्य जगू शकली नसती. या आजीसारखे गरीब पेशंट ऑपरेशन पण करत नसते व हा त्रास सोसत अशीच राहिली असती. आज अग्नि व विद्धकर्माने ती आजी पूर्ववत आयुष्य जगत आहे.
मला तेव्हा कळल की, आयुर्वेद हा सर्वांसाठी आहे. तो गरीब श्रीमंत असा भेद करत नाही. फक्त आपला त्यावर विश्वास असला पाहिजे. त्यावेळी मला कळल की मी जे अग्निकर्म विद्धकर्म शिकत आहे, ती अत्यंत श्रेष्ठ चिकित्सा आहे. डॉ. गोगटे सर किती ग्रेट होते हे मला त्या दिवशी समजल आणि डॉ. देशमुख सर मला गुरू म्हणून भेटले हे माझ केवढ भाग्य!


हा प्रसंग माझ्या आयुष्यात अग्नि विद्धकर्मावर विश्वास निर्माण करण्यात फार महत्त्वाचा ठरला. आता तर रोजच्या प्रॅक्टिस मध्ये पेशंट ठीक होताना पाहून तो आणखीनच वाढत आहे.


अशी महान विद्या शिकवणाऱ्या डॉ. गोगटे सर व डॉ. चंद्रकुमार देशमुख सरांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम…🙏🏻🙏🏻🙏🏻

लेखक.
डॉ. योगेश मरलापल्ले
श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय
उदगीर व लातूर…
7558680016…

श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय​​

Quick Links

Team

Services

Products

Blog

Contact

Branches

Work Hours

।। आयुर्वेदो अमृतानां श्रेष्ठम् ।।

Coming Soon

Edit Template

Copyright © 2023 Shri Varkari Ayurved | Powered By Ambica Labs